अनवाणी वाटेवर निघालोय
वादळातून वाट शोधत
मुखवटे घातलेल्या लोकांपासून
बेभान पळत सुटत
मागे काय सुटत आहे
मी ते पाहत नाही
काहीतरी मिळवण्याची
आस काही सुटत नाही
प्रयत्न माझे मजकडून
नाही कधी थांबणार
वाढत जाणाऱ्या आभाळापुढे
पंखांचा विश्वास नाही डगमगणार
लक्ष्य माझे मला
चुकवायचे नाही
आसमंताला स्पर्शण्यासाठी
जमीन मला सोडायची नाही
- अजय चंद्रकांत ठाकूर
वादळातून वाट शोधत
मुखवटे घातलेल्या लोकांपासून
बेभान पळत सुटत
मागे काय सुटत आहे
मी ते पाहत नाही
काहीतरी मिळवण्याची
आस काही सुटत नाही
प्रयत्न माझे मजकडून
नाही कधी थांबणार
वाढत जाणाऱ्या आभाळापुढे
पंखांचा विश्वास नाही डगमगणार
लक्ष्य माझे मला
चुकवायचे नाही
आसमंताला स्पर्शण्यासाठी
जमीन मला सोडायची नाही